पुणे – पुणेकरांना दररोजच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील 17 प्रमुख रस्त्यांचे रुपडे बदलण्याचा निर्णय घेतला असून, हे रस्ते लवकरच ‘सुपरफास्ट’ होणार आहेत.
महापालिकेच्या ‘मिशन 15’ योजनेला मिळालेल्या यशानंतर आता नव्याने ‘मिशन 17’ सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत शहरातील निवडक 17 रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटवणे, नवीन डांबरीकरण आणि वाहतुकीसाठी योग्य बदल करण्यात येणार आहेत.
या रस्त्यांचा समावेश
या योजनेत खालील 17 प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे:
- फर्ग्युसन रस्ता
- सासवड रस्ता
- कात्रज-मंतरवाडी बायपास
- जुना एअरपोर्ट रस्ता
- आळंदी रस्ता
- जुना पुणे-मुंबई हायवे
- शास्त्री रस्ता
- नेहरू रस्ता
- टिळक रस्ता
- साधू वासवानी रस्ता
- बंडगार्डन रस्ता
- डॉ. आंबेडकर रस्ता
- एम. जी. रस्ता
- प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता
- कोंढवा मुख्य रस्ता
- जंगली महाराज रस्ता
- सेनापती बापट रस्ता
काय होणार बदल?
- रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटवले जाणार
- डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम पूर्ण वेगाने होणार
- चेंबर आणि ग्रेड सेपरेटर दुरुस्ती
- वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी सिग्नल सुधारणा आणि लेन व्यवस्थापन
पुणेकरांना होणार मोठा फायदा
या योजनेमुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि पुणेकरांचा दैनंदिन प्रवास वेगवान आणि सुकर होईल. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
🚦 “मिशन 17” पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक वेगवान होईल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा! 🚗💨