Advertisement
Advertisements

Solar Pump Scheme: सौर कृषिपंप योजनेसाठी आर्थिक फसवणुकीस बळी पडू नका!

Pune News: केंद्र सरकारच्या Agriculture Solar Pump योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. मात्र, काही ठिकाणी या योजनेच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. Solar Pump Scheme संदर्भात महावितरणने स्पष्ट सूचना दिली आहे की, अर्ज भरणे किंवा कोणत्याही प्रकारच्या शुल्कासाठी महावितरणकडून कोणतेही प्रतिनिधी नियुक्त केलेले नाहीत.

Advertisements

शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी रक्कम भरण्यासाठी फक्त ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा. कोणत्याही एजंटकडून ऑफलाइन पैसे भरू नयेत. योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने कोणीही आर्थिक मागणी केल्यास तत्काळ महावितरणच्या स्थानिक उपविभागीय कार्यालयात तक्रार नोंदवा.

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

अर्ज व सौरपंप उभारणीसाठी महत्त्वाचे निर्देश

ऑनलाइन अर्ज: अधिकृत संकेतस्थळ https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/ येथे जाऊन अर्ज करा.
सौरपंपाची रक्कम: फक्त ऑनलाइन पद्धतीने भरा.
बांधकाम साहित्य मागणी: सिमेंट, खडी, वाळू, खड्डे खणणे यासाठी कोणीही पैसे मागत असल्यास महावितरण कार्यालयात तक्रार करा.
सौर पंप उभारणी: अर्जदाराने निवडलेली एजन्सी विना मोबदला सौरपंप बसवून देईल.

Advertisements

ग्राहकांनी दक्ष राहावे

महावितरण OTP (One Time Password) फोनद्वारे मागत नाही. जर कोणीतरी OTP मागत असेल तर तो शेअर करू नये आणि तत्काळ तक्रार नोंदवावी. तसेच, सौरपंप उभारणीच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही आर्थिक फसवणुकीस बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

Advertisements

News Title: Solar Pump Scheme: Don’t fall prey to financial fraud for the solar agricultural pump scheme!

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment