Advertisement
Advertisements

शिरूर प्रांत कार्यालयात मोठी लाचखोरी; महिला अव्वल कारकूनासह दोघांना अटक!

शिरूर (पुणे) – धक्कादायक प्रकार उघड! शिरूर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकून एक लाख साठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, सुजाता मनोहर बडदे असे या लाचखोर कारकूनाचे नाव आहे.

Advertisements

ही लाच त्यांनी थेट घेतली नसून, त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी स्वीकारली होती. त्यामुळे या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विमानतळावर प्रवाशांना पायपीट करावीच लागणार, नक्की काय आहे धोरण?

काय आहे प्रकरण?

तक्रारदार यांची जमीन टेमघर धरणात गेल्याने सरकारने त्यांना शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे दोन गुंठे जमीन मंजूर केली होती. तसेच त्यांच्या आणि भावाच्या कुटुंबातील आठ प्रस्ताव प्रांत कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित होते.

Advertisements

ही मंजुरी मिळवून देण्यासाठी अव्वल कारकून सुजाता बडदे यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे तब्बल चार लाख रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडीनंतर प्रति प्रस्ताव ४० हजार रुपये दराने तीन लाख वीस हजार रुपये देण्याचे ठरले.

पुणे रिंग रोड अपडेट: १५ इंटरचेंज प्रस्तावित, १४५ कोटींचा खर्च

रंगेहाथ पकडले

प्रकरणात पहिला हप्ता म्हणून एक लाख साठ हजार रुपये देताना खाजगी इसम तानाजी मारणे आणि अव्वल कारकून सुजाता बडदे यांना लाचलुचपत विभागाने अटक केली.

Advertisements

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही मोठी कारवाई पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या घटनेने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Pune Metro News
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ऑक्टोबरमध्ये सुरू होणार! ट्रॅफिक जॅममधून सुटका कधी?

Leave a Comment