Advertisement
Advertisements

आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात: विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!

RTE Admissions:आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी हा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा सुवर्णसंधी उपलब्ध झाला आहे. सोमवारी शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आज (दि. 14) जाहीर होणार आहे.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

पालकांसाठी महत्त्वाची माहिती

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान प्रवेश घेता येईल.
  • पालकांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित तालुकास्तर किंवा वॉर्डस्तर समितीशी संपर्क साधावा.
  • विद्यार्थ्यांचे नाव व मोबाईल क्रमांक आरटीई पोर्टलवर उपलब्ध असतील.
  • कागदपत्रे पडताळणीसाठी मूळ प्रत व छायांकित प्रत आवश्यक असेल.
  • प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी हमीपत्र भरून द्यावे.

प्रवेश प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नको!
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, जर पालकांनी चुकीची माहिती भरून प्रवेश घेतला असेल, तर त्यांचा प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो. प्रवेश प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवण्यात आली आहे आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

पालकांनी घ्यायची काळजी

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income
  • प्रतीक्षा यादीतील नाव म्हणजे प्रवेश हमी नाही.
  • फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता वेळोवेळी पोर्टलवर अपडेट्स तपासा.
  • मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.
  • पालकांनी पडताळणीच्या दिवशी उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

संशय असल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा!
आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक गटशिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. पालकांनी प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंटचा वापर करू नये आणि सरकारी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements
स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या आत्महत्येचा प्रयत्न, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयश! – अमितेश कुमार

Leave a Comment