Advertisement
Advertisements

धक्कादायक! पुण्यात GBS ने घेतला आणखी एक बळी, 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune News: पुणे | पुण्यातील गिलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मीळ पण गंभीर आजाराने चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. मागील काही दिवसांपासून या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, आता मृतांचा आकडाही सातवर पोहोचला आहे. बिबवेवाडीत राहणाऱ्या 37 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Advertisements

रुग्णसंख्या सतत वाढतेय Pune News

GBS मुळे पुण्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, 10 फेब्रुवारी रोजी ही संख्या 192 वर गेली आहे. मागील 24 तासांत आठ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या आजारामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा मृत्यू पुण्यात, तर एक सोलापुरात झाला आहे. Pune News

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

गंभीर परिणाम, रुग्ण ICU मध्ये

GBS मुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, स्नायूंची शक्ती कमी होते आणि काही रुग्ण गंभीर अवस्थेत जातात. सध्या पुण्यात 48 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यातील 21 जणांना व्हेंटिलेटरचा आधार द्यावा लागत आहे.

Advertisements

आरोग्य विभाग सतर्क, नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील विविध भागांमध्ये सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

37 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

बिबवेवाडीत राहणाऱ्या तरुणाला 31 जानेवारी रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र काही दिवसांतच त्रास पुन्हा वाढला. त्याला कमला नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisements

GBS बाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण Pune News

GBS हा दुर्मिळ आजार असला तरी सध्या पुण्यात त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, प्रशासन सतर्क राहण्याचं आवाहन करत आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

News Title: Pune’s Guillain-Barré Syndrome Cases Surge; 37-Year-Old Dies, Death Toll Reaches 7

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment