Advertisement
Advertisements

सहा गावांसाठी पाणीपुरवठा योजनेला ५६२ कोटींची गरज, महापालिकेची राज्य सरकारकडे मागणी

Pune news : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला, धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड आणि सणसवाडी या गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठी ५६२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. या भागात दूषित पाण्यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण आढळल्याने जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या टाक्यांची नितांत गरज भासली आहे.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

महापालिकेच्या अहवालानुसार, सध्या या गावांना सुमारे ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यातील २८ एमएलडी पाणी हे रॉ-वॉटर स्वरूपात असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. २०२४ मध्ये या गावांची लोकसंख्या १.७८ लाख असून, २०५२ पर्यंत ती ४.२७ लाखांपर्यंत पोहोचेल. त्यानुसार, भविष्यातील पाण्याची गरज ८९ एमएलडी होणार आहे.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

यासाठी पुणे महापालिकेने या गावांसाठी स्वतंत्र समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात खडकवासला येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून, २९ पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत असल्याने या प्रकल्पासाठी ५१५ कोटी रुपयांचा निधी आणि ११ एकर भूसंपादनासाठी ४७ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. प्रशासनाच्या मते, हा निधी लवकर उपलब्ध झाल्यास या भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता येईल आणि भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सुटण्यास मदत होईल.

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

Advertisements
स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या आत्महत्येचा प्रयत्न, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयश! – अमितेश कुमार

Leave a Comment