Advertisement
Advertisements

Pune Police News:पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना धडा; भरचौकात दिला चोप!

Pune Police News: पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची भरचौकात धिंड काढून त्यांना चोप देण्याचा नवा फॉर्म्युला पुणे पोलिसांनी आणला आहे. महिलांची छेडछाड करणाऱ्या किंवा कोयते फिरवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे—”सरळ रहा नाहीतर भरचौकात फोडू!”

Advertisements

बिबवेवाडीत गुन्हेगारांची धिंड

बिबवेवाडी परिसरात खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. आरोपींनी ज्या भागात दहशत माजवली, त्याच भागातून त्यांना फिरवत पोलिसांनी कायद्याची ताकद दाखवून दिली. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

“भाईगिरी”ला पुणे पोलिसांचा दणका

स्वयंघोषित “भाईंना” धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनी हे नवीन धोरण आखले आहे. कोयते फिरवणाऱ्या गुंडांना चौरस्त्यावर चोप दिला जात आहे, जेणेकरून इतर गुन्हेगारांवरही वचक बसावा. पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये धारदार कोयते आणि गावठी कट्ट्यांचाही समावेश आहे.

Advertisements

अजित पवारांचे थेट आदेश

पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना कडक आदेश दिले आहेत—”गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, त्यांची धिंड काढा!” या आदेशानंतर पोलिसांनी आपल्या कारवाईला वेग दिला असून, येरवडा, कोंढवा आणि इतर भागात पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहेत.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

येरवड्यातील गँगस्टरला पोलिसांचा थप्पडमार

येरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि त्याच्या साथीदारांनी जामिनावर सुटल्यावर परिसरात फेरी काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत कसबेच्या ३५-४० साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. काही साथीदारांना अटक करून त्यांची येरवड्यात भरचौकात धिंड काढण्यात आली. पोलिसांनी नागरिकांसमक्ष मंडप उभारून आरोपींना चांगलाच चोप दिला. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.

Advertisements

मुख्य आरोपी फरार, शोध सुरू

मुख्य आरोपी प्रफुल्ल कसबे सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी विशेष पोलिस पथके सक्रिय झाली आहेत. पुणे पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे – “गुन्हेगारीला पाठिंबा दिला तर कारवाई निश्चितच होईल!”

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

या प्रकारानंतर पुण्यात गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पुणे पोलिसांचा हा “धिंड पॅटर्न” भविष्यात गुन्हेगारी कमी करण्यास किती प्रभावी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment