Advertisement
Advertisements

Pune news:पुण्याला मिळणार नवीन १६ मजली अत्याधुनिक बसस्थानक

पुणे: अखेर पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. शिवाजीनगर बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला मुहूर्त मिळाला असून महाराष्ट्र दिनी (१ मे) या भव्य प्रकल्पाचे भूमीपूजन होणार आहे. तब्बल ६०० कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या इमारतीत तळमजल्यावर बसस्थानक आणि वरील मजल्यांवर सरकारी व खाजगी कार्यालये असतील. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण होणार आहे.

Advertisements

मुंबईत महत्त्वाची बैठक

या प्रकल्पासंबंधी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

एसटी प्रवाशांचा त्रास लवकरच संपणार

पाच वर्षांपूर्वी शिवाजीनगर बसस्थानक वाकडेवाडी येथे हलवण्यात आले होते. त्यामुळे एसटी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षाचा अतिरिक्त खर्च, असुविधाजनक वाहतूक आणि रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी समस्या बनली होती. आता हे स्थानक पूर्वीच्या ठिकाणी नव्या स्वरूपात उभारले जाणार असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisements

महामेट्रो व एसटी महामंडळात मतभेद

शिवाजीनगर बसस्थानक पाडल्यानंतर महामेट्रो कंपनी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार झाला होता. मात्र, नंतर दोन्ही संस्थांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि प्रकल्प रखडला. सरकारमध्येही काही बदल झाले, त्यामुळे अनेक वर्षे हा विषय प्रलंबित राहिला. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीची वैशिष्ट्ये

✔ ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्वावर उभारणी
✔ तळमजल्यावर बसस्थानक, वर व्यावसायिक संकुल
✔ स्थानकाखाली वाहनतळासाठी दोन तळघर
✔ १६ मजली भव्य इमारत
✔ अंदाजे ६०० कोटी रुपये खर्च
✔ तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

Advertisements

पुणेकरांची एकच मागणी – लवकरात लवकर काम सुरू करा!

या प्रकल्पासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये श्रेय घेण्याची चढाओढ लागली असली तरी पुणेकरांची एकच मागणी आहे – “स्थानक वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने उभारले जावे!” पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

Leave a Comment