Advertisement
Advertisements

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन ! Pune International Film Festival 2025

पुणे : पुणे शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (Pune International Film Festival 2025) दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संध्याकाळी पाच वाजता या सोहळ्याचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisements
Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना “पीएफ डिस्टिंग्विश अवॉर्ड” देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच, संगीत क्षेत्रातील मोठे योगदान लक्षात घेता ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना “संगीतकार एस.डी. बर्मन पुरस्कार” प्रदान केला जाणार आहे.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

राज कपूर जन्मशताब्दी वर्ष विशेष थीम
या वर्षीच्या महोत्सवाची विशेष थीम “शो मॅन: राज कपूर जन्मशताब्दी वर्ष” अशी ठेवण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात प्रख्यात चर्मवाद्य वादन विजय चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अप्रतिम वादनाने होणार आहे.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

देशी-विदेशी चित्रपटांची मेजवानी
13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या चित्रपट महोत्सवात तब्बल 150 हून अधिक देशी-विदेशी चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यातील 14 चित्रपट जागतिक स्पर्धा विभागात, तर 7 चित्रपट मराठी स्पर्धा विभागात प्रदर्शित होणार आहेत.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला आणि सिनेमा प्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

Leave a Comment