Advertisement
Advertisements

पुणे: अंबेडकर नगरमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश

पुणे पोलिसांनी अंबेडकर नगर, गल्लीनंबर ४ येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली. मार्केटयार्ड पोलिसांनी छापा टाकून गॅस रिफिलिंगचे सर्व साहित्य जप्त केले.

Advertisements
Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

बंदी नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर (३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मोठ्या घरगुती गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे धोकादायक आणि बेकायदेशीर काम करत होता. पोलिसांनी घटनास्थळी गॅस रिफिलिंगसाठी लागणारे सर्व साहित्य जप्त केले असून, हे साहित्य दावल एंटरप्रायझेसच्या मालकीचे असल्याचे आढळले.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम २८७ आणि २८८ तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

Leave a Comment