Advertisement
Advertisements

बाहेरून पिझ्झा मागवल्याने विद्यार्थिनींवर कारवाई – वसतिगृह प्रशासनाचा निर्णय

PCMC News – पिंपरी : सरकारी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी बाहेरून पिझ्झा मागवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थिनींचा वसतिगृह प्रवेश एका महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे घडला आहे.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

मोशी येथील संत नगर, (Sant Nagar) स्पाईन रोड (Spine Road, Moshi) येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह (Government Hostel) आहे. येथे सुमारे २५० विद्यार्थिनी राहतात. या वसतिगृहातील एका खोलीतील चार विद्यार्थिनींनी बाहेरून पिझ्झा मागवल्याचे (Pizza Order)निदर्शनास आल्यानंतर वसतिगृह प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

६ फेब्रुवारी २०२५ रोजी बजावलेल्या नोटिशीनुसार, ३० जानेवारी रोजी वसतिगृहाच्या पाहणीत एका खोलीत पिझ्झाचा बॉक्स आढळून आला. बाहेरील खाद्यपदार्थ वसतिगृहात आणण्यास सक्त मनाई असतानाही संबंधित विद्यार्थिनींनी हा नियम मोडल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून चौकशी केल्यानंतर कोणीही बाहेरून पिझ्झा मागवल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे आठ फेब्रुवारीपर्यंत दोषी असल्याचे मान्य करावे, अन्यथा चौघींवर एका महिन्यासाठी वसतिगृहात राहण्यास बंदी घालण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला होता.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

शेवटी, संबंधित विद्यार्थिनींना एका महिन्यासाठी वसतिगृह प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वसतिगृहाच्या नियमानुसार, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मनाई आहे. मात्र अशा प्रकारच्या निर्णयाने पालक नाराज असून, अशा छोट्या चुकीसाठी विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर काढणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

News Title: Action taken against female students for ordering pizza from outside – hostel administration’s decision

Advertisements
स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या आत्महत्येचा प्रयत्न, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयश! – अमितेश कुमार

Leave a Comment