Advertisement
Advertisements

सैराट ची आर्ची होणार या घरची सून !

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबात नव्या सुनबाईच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या मुलगा कृष्णराज महाडिक आणि ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू यांच्या एका फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा रंगली असून, कोल्हापूरकरांनी ‘महाडिकांची तिसरी सून Coming Soon’ असे म्हणत फोटोवर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Advertisements

🔹 कृष्णराज-रिंकूच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

१० फेब्रुवारी रोजी कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कृष्णराज आणि रिंकू एकत्र दर्शनाला गेले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या अंदाजांना उधाण दिले. KM Office या फॅन पेजवर हा फोटो शेअर होताच नेटिझन्सच्या कमेंट्सनी सोशल मीडियावर गोंधळ उडवला.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

🔹 लग्नाच्या चर्चेला उधाण?

रिंकू राजगुरू ही कायम चर्चेत असते. तिच्या लग्नाविषयी सतत चर्चा होत असते. या फोटोमुळे रिंकूच्या लग्नाच्या चर्चांना नवीन फोडणी मिळाली आहे. अनेकांनी हा फोटो पाहून “झालं झिंग झिंग झिंगाट!” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements

🔹 सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

👉 एका चाहत्याने लिहिलं, “साहेबांनी सांगितलेलं लगेच मनावर घेतलं का?
👉 दुसऱ्याने कमेंट केली, “ते नव्ह जोडा, बाकी शोभतोय!
👉 एकाने गंमतीने लिहिलं, “भावा, घाबरलो ना… ठरलं की काय वाटलं!
👉 तर आणखी एका चाहत्याने लिहिलं, “कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील आमदार!

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

🔹 कृष्णराज महाडिक कोण आहे?

कृष्णराज हा फक्त धनंजय महाडिक यांचा मुलगा म्हणून नाही, तर त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे प्रसिद्ध आहे. तो एक प्रसिद्ध युट्यूबर, उद्योजक आणि समाजसेवक आहे. जगभरातील रेसिंग क्षेत्रात त्याने आपला ठसा उमटवला आहे. आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

Advertisements

🔹 रिंकूबद्दल काय म्हणतात चाहते?

काही चाहत्यांनी कृष्णराजसाठी अधिक चांगली जोडी हवी असंही मत मांडलं. तर काहींनी रिंकूला “बेस्ट” म्हटलं. सोशल मीडियावर कृष्णराज आणि रिंकूच्या नात्याबाबत कोणताही खुलासा नाही, पण चाहत्यांनी मात्र त्यांना जोडपं म्हणून पाहायला सुरुवात केली आहे!

कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

🔹 पुढे काय होणार?

हा फोटो केवळ मित्रत्वाच्या नात्याचा आहे की आणखी काहीतरी आहे? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सध्या तरी सोशल मीडियावर “महाडिकांची तिसरी सून” हा ट्रेंड चर्चेचा विषय बनला आहे! 🔥

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

Leave a Comment