Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी आली आहे. Indian Army NCC Special Entry Scheme अंतर्गत Short Service Commission (SSC Non-Technical) साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, लेखी परीक्षेची गरज नाही आणि थेट SSB Interview द्वारे निवड केली जाईल. भारतीय सैन्यात अधिकारी पदावर निवड झाल्यास ₹56,100 ते ₹2,50,000 पर्यंत पगार मिळणार आहे.
Advertisements
रिक्त पदांचा तपशील
Indian Army NCC Special Entry 2025 अंतर्गत एकूण 70 पदे भरली जाणार आहेत:
- NCC पुरुष (सामान्य): 63 पदे
- NCC पुरुष (विशेष): 7 पदे
- NCC महिला (सामान्य): 5 पदे
- NCC महिला (विशेष): 1 पद
पात्रता आणि वयोमर्यादा
- उमेदवार किमान 19 वर्षे आणि कमाल 25 वर्षे वयोगटातील असावा.
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात, पण त्यांना मागील वर्षात 50% गुण असणे आवश्यक आहे.
पगार आणि भत्ते
Indian Army Officer Salary:
Advertisements
- पगार: ₹56,100 ते ₹2,50,000 प्रति महिना (पदाच्या लेव्हलनुसार)
- भत्ते: मोफत राहण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, पेन्शन, आणि विविध भत्ते
निवड प्रक्रिया – कोणतीही लेखी परीक्षा नाही!
- शॉर्टलिस्टिंग: उमेदवारांची पदवीतील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग होईल.
- SSB Interview: शॉर्टलिस्टेड उमेदवारांना प्रयागराज, भोपाळ, बेंगळुरू, जालंधर येथे SSB इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.
- वैद्यकीय चाचणी: SSB क्लिअर केल्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल.
- Merit List: अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.
अर्ज कसा कराल?
- ऑनलाइन अर्ज: अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज भरता येईल.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 मार्च 2025
- अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
जर तुम्हाला Indian Army मध्ये अधिकारी बनायचं असेल, तर ही संधी गमावू नका!
Advertisements