Advertisement
Advertisements

कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; तीन दिवसांत २७६ एकरवरील १,५११ बांधकामे जमीनदोस्त!

चिखली : चिखली आणि कुदळवाडी परिसरात सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे पाडली. तीन दिवसांच्या मोहिमेत तब्बल २७६ एकर जागेवरील १,५११ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Advertisements

शहरातील नियोजित विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड, नागरी सुविधा क्षेत्र आणि सार्वजनिक मालमत्तांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या पत्राशेड, गोदामे, कारखाने आणि भंगार दुकाने हटवण्याची ही धडक कारवाई होती. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही मोहीम हाती घेतली असून पुढेही ती सुरूच राहणार आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

तीन दिवसांत जोरदार कारवाई

या मोहिमेत सोमवारी ३३.५८ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या ६८२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या १८० जवानांसह ६०० पोलिस आणि मजूर कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Advertisements

अतिक्रमण हटवण्यासाठी १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन, ४ कटर, तसेच ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. याशिवाय महापालिका यंत्रणेसह पोलिस आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

अशी झाली जमीनदोस्त कारवाई

  • ८ फेब्रुवारी४२ एकर, २२२ बांधकामे, १८.३६ लाख चौरस फूट क्षेत्रफळ
  • ९ फेब्रुवारी१५७ एकर, ६०७ बांधकामे, ६८.७८ लाख चौरस फूट क्षेत्रफळ
  • १० फेब्रुवारी७७ एकर, ६८२ बांधकामे, ३३.५८ लाख चौरस फूट क्षेत्रफळ
  • एकूण२७६ एकर, १,५११ बांधकामे, १ कोटी २०.७२ लाख चौरस फूट क्षेत्रफळ

अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका

महापालिकेच्या या मोठ्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात नियोजनबद्ध विकास होण्यासाठी आणि नागरी सुविधांसाठी जागा मोकळी करण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे. भविष्यात अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Advertisements

illegal constructions-on-276-acres-in-kudalwadi-demolished-pune

कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

Leave a Comment