Advertisement
Advertisements

Pune News:चिखलीत सहाव्या दिवशीही धडक कारवाई; ५५३ अनधिकृत बांधकामांवर निष्कासन

Pune News:चिखलीतील कुदळवाडी भागात सलग सहाव्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ५५३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून, १३४ एकर भूभागावरील ५८ लाख चौरस फूट बांधकामावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

महापालिका आणि पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन Pune News

ही मोहीम महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. या कारवाईत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, विवेक पाटील, विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर

या मोहिमेसाठी ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मोठ्या संख्येने मजूर सहभागी झाले. निष्कासनासाठी ४४ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन, ४ कटर मशीन यांचा वापर करण्यात आला. तसेच, ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार

महापालिकेच्या आरक्षित जागा, विकास आराखड्यातील रस्ते, अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे आणि भंगार दुकाने यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका, पोलीस आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

Advertisements
स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या आत्महत्येचा प्रयत्न, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयश! – अमितेश कुमार

Leave a Comment