Advertisement
Advertisements

‘छावा’चा पहिल्याच दिवशी तुफान जलवा! ७ चित्रपटांना मागे टाकत जबरदस्त कमाई

Chhaava box office collection:छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावत असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल 19.08 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

पहिल्या दिवसाच्या कमाईत ७ चित्रपटांना मागे टाकलं! Chhaava box office collection

‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः मुसंडी मारली असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सात चित्रपटांना मागे टाकण्याचा विक्रम केला आहे.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा
  • इमर्जन्सी (2.5 कोटी) आणि आझाद (1.5 कोटी) या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा ‘छावा’ अनेक पटींनी पुढे आहे.
  • नुकत्याच आलेल्या स्काय फोर्स (12.25 कोटी) आणि देवा (5.5 कोटी) यांना देखील ‘छावा’ने मागे टाकले.
  • अलिकडेच प्रदर्शित लव्हयापा (1.25 कोटी) आणि बॅडएस रवीकुमार (2.75 कोटी) हे चित्रपट देखील ‘छावा’च्या तुफानी कमाईसमोर फिके पडले.
  • दाक्षिणात्त्य सुपरस्टार नागा चैतन्यच्या थंडेल (11.5 कोटी) च्या कमाईलाही ‘छावा’ने झपाट्याने ओलांडले.

अजून वाढेल ‘छावा’ची कमाई!

‘छावा’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याने या चित्रपटाची कमाई अजून वाढण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी 19.08 कोटींची जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आणखी किती मोठा गल्ला कमवला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

Leave a Comment