बँक ऑफ बडोदामध्ये Apprentice पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. Bank of Baroda Recruitment 2025 अंतर्गत तब्बल 4,000 पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांना bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया 19 मार्चपासून सुरू होईल आणि शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे.
Advertisements
पात्रता आणि वयोमर्यादा:
- उमेदवार कुठल्याही शाखेतील ग्रॅज्युएट असावा.
- उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
- SC/ST आणि OBC उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे.
- उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Application Fee:
- General/OBC उमेदवार: ₹800
- SC/ST उमेदवार: ₹600
- दिव्यांग उमेदवार: ₹400
- सर्व अर्जदारांना GST शुल्क अतिरिक्त भरावे लागेल.
Bank of Baroda Apprentice 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया:
- bankofbaroda.in वेबसाइटवर जा.
- Career टॅब निवडा आणि Current Opportunities वर क्लिक करा.
- Apprentice Apply Link शोधून क्लिक करा.
- नोंदणी करा आणि अर्ज भरा.
- आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फी भरून सबमिट करा.
Bank of Baroda Apprentice Selection Process 2025:
- उमेदवारांची निवड CBT परीक्षा, भाषा चाचणी, मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन याद्वारे केली जाईल.
- परीक्षेत सामान्य ज्ञान, आर्थिक जागरूकता, संगणक ज्ञान आणि इंग्रजीशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
- अधिक माहितीसाठी बँकेची अधिकृत नोटिफिकेशन चेक करा.
👉 Bank of Baroda Apprentice 2025 भरतीबाबत अपडेट मिळवण्यासाठी bankofbaroda.in वेबसाइटला भेट द्या.
Advertisements