Advertisement
Advertisements

पुणे जिल्हा पर्यटन आराखड्याला गती; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महोत्सवाच्या तयारीला वेग Pune Tourism

Pune Tourism:पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक ठिकाणे, वन्यजीव क्षेत्र, कृषी पर्यटन, जल पर्यटन, साहसी खेळ यांचा समावेश असलेला सर्वसमावेशक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. पर्यटनाचा विकास करताना पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवावा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements

पर्यटन आराखड्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये

✅ जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन व संवर्धन
✅ पर्यटकांसाठी डिजिटल सुविधा व मार्गदर्शन
✅ स्थानिक रोजगार आणि संस्कृतीला चालना
✅ पर्यावरणपूरक पर्यटन विकास
✅ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपवनसंरक्षक महादेव मोहिते, पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisements

गडकिल्ल्यांच्या विकासावर भर Pune Tourism

जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले की, पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे जागतिक पातळीवरील पर्यटनस्थळे बनू शकतात. याठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडकिल्ल्यांच्या विकासातून स्थानिक नागरिकांसाठी रोजगारनिर्मिती, लोकपरंपरा, कला, संगीत आणि साहित्याला चालना देण्याचा हेतू आहे.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

पर्यटन सुविधांमध्ये वाढ

पर्यटन स्थळांवर रस्ते, दिशादर्शक फलक, भोजनालय, निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, नामांकित पर्यटन तज्ज्ञांच्या मदतीने आधुनिक सुविधा विकसित करण्याचा निर्णय झाला.

Advertisements

पर्यटन महोत्सवाचे आयोजन

येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये पुणे जिल्ह्यात पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन मार्गदर्शक आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होतील. पुणे जिल्ह्याचे पर्यटन जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

जुन्नर पर्यटन आराखडा अद्याप रखडला

राज्य शासनाने जुन्नर तालुक्याला २०२४ मध्ये अधिकृत पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. मात्र, अद्याप पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. माजी आमदार अतुल बेनके यांच्या पुढाकाराने हा आराखडा तयार करण्यात आला होता. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केल्यानंतरही हा आराखडा अद्याप गुलदस्त्यात आहे.

पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याला गती मिळाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि जिल्ह्यातील नैसर्गिक व सांस्कृतिक ठेवा नव्या उंचीवर पोहोचेल. 🚀

कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना
Acceleration of Pune District Tourism Plan; Pune Tourism speeds up festival preparations in November-December

pune metro news
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोचा मोठा निर्णय!

Leave a Comment