Advertisement
Advertisements

पुण्यात चोऱ्यांचा सुळसुळाट; महिलांचे लाखोंचे दागिने लंपास

पुणे: शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, महिलांचे लाखोंच्या किमतीचे दागिने चोरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विश्रांतवाडी, पीएमपी प्रवास आणि खासगी रुग्णालयात अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Advertisements
Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

विश्रांतवाडीत बनावट पोलिसांकडून चोरी
विश्रांतवाडी परिसरात ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी लुटले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास एअरपोर्ट रोडवर ही घटना घडली. चोरट्यांनी महिलेला ‘या भागात चोरीचे प्रकार वाढले आहेत, तुमचे दागिने सुरक्षित ठेवावेत’ असे सांगत पिशवीत ठेवण्यास भाग पाडले. बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी साडेतीन तोळे मंगळसूत्र आणि दोन तोळ्यांची मोहनमाळ असा जवळपास पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

पीएमपी प्रवासात महिलांचे दागिने चोरीला
पीएमपी बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पिशवीतून दागिने आणि रोकड चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. खडकी आणि वानवडी भागात झालेल्या या घटनांमध्ये तब्बल अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एका घटनेत शिवाजीनगर ते नाशिक फाटा मार्गावर ३९ वर्षीय महिलेच्या पिशवीतून १ लाख ११ हजार रुपयांचे दागिने व रोकड चोरीला गेले. तर दुसऱ्या घटनेत स्वारगेट ते हडपसर प्रवास करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या पिशवीतून १ लाख ३६ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले.

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

खासगी रुग्णालयातून दोन लाखांचे मंगळसूत्र गायब
गणेश पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ७५ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेले. या महिलेने गादीखाली ठेवलेली पिशवीतील दोन लाखांचे मंगळसूत्र सफाई कर्मचाऱ्याने चोरल्याचा आरोप आहे. खडक पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

पुण्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी यासंदर्भात अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

Leave a Comment