Teacher viral video 2025 शिक्षिकांमध्ये भांडण, मारहाणीचा थरारक व्हिडिओ व्हायरल!
पटना जिल्ह्यात एका शाळेत मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिकेमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोघींनी वर्गातच भांडण सुरू करत एकमेकींना अक्षरशः धु धु धुतलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
क्लासरूममध्ये वाद, शेतात मारहाण
ही घटना बिहटा प्रखंडातील एका विद्यालयात घडली असून, एका छोट्याशा कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत गेला. विद्यार्थ्यांसमोरच दोघींच्या भांडणाला सुरुवात झाली आणि नंतर ते शाळेबाहेर शेतातही चालू राहिले. दोघींनीही एकमेकींचे केस ओढत, चपलांनी, लाथांनी आणि थप्पडांनी हल्ला केला.
आईनेही घेतली सहभाग, विद्यार्थ्यांना धक्का
या वादात एका शिक्षिकेच्या आईनेही उडी घेत दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून विद्यार्थी आणि इतर शिक्षकही हादरले. काही महिला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र शिक्षिकांनी ऐकले नाही.
गावकऱ्यांनी व्हिडिओ केला व्हायरल
घटनेचे साक्षीदार असलेल्या गावातील काही तरुणांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. पाहता पाहता व्हिडिओ व्हायरल झाला आणि संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली.
शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
या प्रकारावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, हा शिक्षिकांमधील व्यक्तिगत वाद आहे. त्यांच्याकडून या घटनेवर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच, या प्रकाराबाबत उच्च अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे.
पालक संतप्त, विद्यार्थ्यांवर परिणाम
शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकही नाराज झाले असून, अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी शाळेत सकारात्मक वातावरण ठेवावे आणि वाद शाळेबाहेर मिटवावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
सोशल मीडियावर टीकेची झोड
या घटनेनंतर सोशल मीडियावरही लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. “शिक्षक विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल असतात, पण जर असे प्रकार घडत असतील, तर मुलांना कोणते शिक्षण मिळणार?” अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्स करत आहेत.
शाळेतील शिस्तीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शाळेतील शिस्त आणि प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दोन्ही शिक्षिकांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.