Advertisement
Advertisements

बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून 70 लाखांचं सोनं गायब! न्यायालयाचा संताप, बँक आणि आयकर विभागाला मोठा झटका

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमध्ये ठेवलेलं 70 लाख रुपयांचं सोनं गायब झाल्याची बाब उघडकीस आली आहे. हे सोने आयकर विभागाने जप्त केलेलं होतं. मात्र, आता तेच सोनं गहाळ झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आयकर विभाग आणि बँक एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 35 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisements

न्यायालयाचा मोठा आदेश

या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झाली. न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने बँक आणि आयकर विभागावर ताशेरे ओढले. सध्याच्या बाजारभावानुसार सोन्याचा दर 80,000 रुपये तोळा आहे आणि गहाळ झालेलं सोने सुमारे 70 तोळे होतं. त्यामुळे बँक आणि आयकर विभागाने 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत 70 लाख रुपये कोर्टात जमा करावेत, असा आदेश देण्यात आला. पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

पत्नीची शेवटची आठवण गहाळ!

ही घटना हिरालाल मालू यांच्या बाबतीत घडली आहे. 2005 मध्ये आयकर विभागाने त्यांच्या पत्नीचं सोनं जप्त केलं होतं. मात्र, त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर हेच सोनं परत मिळावं म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. हे सोनं पत्नीची शेवटची आठवण असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आयकर विभाग आणि बँक हे सोनं नेमकं कुठे गेलं, याबद्दल एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

Advertisements

बँकेच्या वागणुकीवर न्यायालयाचा संताप

बँक ऑफ महाराष्ट्रने न्यायालयात एक शपथपत्र सादर केलं असून, या याचिकेला मोठा दंड ठोठावून फेटाळून लावण्याची विनंती केली आहे. मात्र, न्यायालयाने या शपथपत्रावर तीव्र नाराजी व्यक्त करत बँकेला फटकारलं.

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

आयकर विभागाची विशेष बैठक

सोनं गायब झाल्याच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आयकर विभागाने विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अॅड. सुरेश कुमार यांनी 14 फेब्रुवारीची सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य केली आहे. बँकही या प्रकरणात आपला निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisements

सोनं नेमकं गेलं कुठे?

मोठ्या कारवाईनंतर आयकर विभाग जप्त केलेली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेकडे सुपूर्द करतो. मात्र, या प्रकरणात 70 लाखांचं सोनं गायब झालं, हे एक मोठं गूढ बनलं आहे. त्यामुळे आता आयकर विभाग आणि बँक यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

Leave a Comment