Advertisement
Advertisements

पुणे रेल्वे विभागाला ‘महाकुंभ’मुळे मोठा फायदा; महिनाभरात १० कोटींहून अधिक कमाई ! Pune Railway News

Pune Railway News: पुणे – प्रयागराज येथे सुरू असलेल्या ‘महाकुंभ’च्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मोठा महसूल मिळवला आहे. पुणे ते प्रयागराजदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक आणि विशेष अशा सहा रेल्वेगाड्यांमधून गेल्या ३३ दिवसांत १०.४८ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. याबाबतची माहिती रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी दिली. Pune Railway News

Advertisements
Pune Railway News
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे लवकरच सुरू होणार? मंत्र्यांची मोठी बैठक ठरली!

‘महाकुंभ’च्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावरून प्रयागराजसाठी तीन साप्ताहिक आणि तीन विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. १ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत या सहा रेल्वेगाड्यांचे एकूण ६६ फेऱ्या झाल्या. या सेवांमुळे एक लाख ६ हजार ३३२ प्रवाशांनी प्रवास केला आणि पुणे रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला. Pune Railway News

Pune Metro News
फक्त ₹२० मध्ये संपूर्ण दिवस मेट्रो प्रवास! महिलांसाठी पुणे मेट्रोची धमाकेदार ऑफर

रेल्वे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, सोमवारी (१० फेब्रुवारी) आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. प्रयागराज स्थानकावर गर्दी वाढली असली, तरी प्रवाशांच्या सोयीसाठी फाफमऊ, नैनी, प्रयागराज संगम, प्रयागराज चौकी, प्रयागराज रामबाग, जुगी आणि सुबेदार गंज या आठ स्थानकांवर थांबण्याची सुविधा करण्यात आली आहे. Pune Railway News

Advertisements
PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची आणि पायाभूत सुविधांची विशेष काळजी घेतली जात असून, अजूनही पुण्यातून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वे तिकिटांसाठी मोठी मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

News Title: Pune Railway Department benefits greatly from ‘Mahakumbh’; Earns more than 10 crores in a month!

Advertisements
कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

Leave a Comment