Pune Crime News पुण्यातील बिबवेवाडी (Bibvewadi) येथे राहणारे वास्तुशास्त्र तज्ज्ञ (VAstu Expert)दत्तात्रय वरघडे (४३) यांची एका क्रूर कटातून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. वरघडे हे पुण्यातील नर्हे-अंबेगाव भागात वास्तु पूजेच्या निमित्ताने १६ ऑक्टोबर २०२२ रोजी गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत.
वरघडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, वरघडे हे शेवटचे खाजगी कॅब (Private Cab) चालक दीपक जयकुमार नराळे (३५) याच्या सोबत दिसले होते. नराळे हा बिबवेवाडीच्या अप्पर इंदिरानगर येथे राहणारा असून, वरघडे यांनी पूर्वीही अनेकदा वास्तु पूजेसाठी प्रवास करताना त्याची गाडी वापरली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता, नराळे व त्याचा साथीदार रंजीत द्यानदेव जगदाळे (२९) यांच्यावर संशय बळावला. २२ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
वरघडे यांनी १६ ऑक्टोबरला पूजा पूर्ण केल्यानंतर नराळेने त्यांना कॉफी (Cofee) प्यायला दिली, ज्यामध्ये गुंगी येईल असे औषध मिसळले होते. त्यानंतर ते बेशुद्ध पडताच नराळे व जगदाळे यांनी त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह गोणपाटात बांधून भोर तालुक्यातील सारोळा गावाजवळील नीरा नदीत फेकून दिला.
वरघडे यांना सोन्याचे दागिने ( Gold Jewelry) परिधान करण्याची आवड होती. हत्या झालेल्या वेळी त्यांच्या अंगावर तब्बल २५० ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold Jwellery of 20 gram) होते. नराळे व जगदाळे यांनी त्यांना लुबाडण्याच्या हेतूने हा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
हत्या केल्यानंतर नराळे व त्याच्या साथीदाराने वरघडे यांचा मोबाईल सुरू ठेवला आणि गाडी त्यांच्या घराजवळ नेली. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांना वरघडे यांना घरी सोडल्याचा खोटा जबाब दिला. मात्र, पोलिसांनी जोरदार तपास करून १० दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर ३ नोव्हेंबर रोजी वरघडे यांचा मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढला.
बिबवेवाडी पोलिस ठाण्यात नराळे आणि जगदाळे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
News Title: Pune Crime News: Brutal murder of ‘Vastu’ expert who fell for gold!