Advertisement
Advertisements

मोठी बातमी: ‘Ladki Bahin Yojana’ मधून 9 लाख बहिणी अपात्र, 1500 रुपये बंद होणार, ई-KYC अनिवार्य!

मुंबई – महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) तब्बल 9 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे सरकारचे 945 कोटी रुपये वाचणार आहेत. नव्या निकषांनुसार, लाभार्थी महिलांना दरवर्षी ई-KYC करणे बंधनकारक करण्यात आले असून, ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेतून वगळले जाईल.

Advertisements

9 लाख महिला अपात्र, सरकारचा मोठा निर्णय

सुरुवातीला सरकारने 5 लाख महिलांना अपात्र ठरवले होते, परंतु आता अजून 4 लाख महिलांना वगळले जाणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. यामध्ये वाहनधारक 2.5 लाख महिला, इतर सरकारी लाभ घेणाऱ्या महिला आणि निकषात बसत नसलेल्या महिलांचा समावेश आहे.

PMPML ने महिला सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय!

नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना एकत्र

राज्यातील 5 लाख महिला एकाच वेळी ‘Ladki Bahin Yojana’ आणि ‘Namo Shetkari Yojana’ चा लाभ घेत होत्या. त्यामुळे योजनेत बदल करून त्यांना आता फक्त 500 रुपये ‘Ladki Bahin Yojana’ अंतर्गत मिळणार असून, उर्वरित 1000 रुपये ‘Namo Shetkari Yojana’ मधून मिळतील.

Advertisements

नवीन नियमावली: दरवर्षी KYC आवश्यक

राज्य सरकारने आता ‘Ladki Bahin Yojana’ साठी नवीन निकष जारी केले आहेत. लाभार्थींना दरवर्षी जून महिन्यात ई-KYC करणे बंधनकारक असेल. 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबवण्यात येईल.

पेट्रोलपंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा

आयकर विभागाकडून लाभार्थ्यांची तपासणी

योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकारने आयकर विभागाशी समन्वय साधला आहे. महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास त्यांना त्वरित अपात्र घोषित केले जाणार आहे.

Advertisements

अर्जांची फेरतपासणी सुरू

सुमारे 16.5 लाख महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर फेरतपासणी सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांच्या अर्जात नावे चुकीची आढळली आहेत, आधार लिंक नसलेल्या महिलांना योजनेतून बाद केले जाणार आहे.

कर्वे नगर डीपी रस्त्याच्या भूसंपादनाला गती: विशेष कक्षाची स्थापना

फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान, ‘Ladki Bahin Yojana’ अंतर्गत येत्या फेब्रुवारी महिन्यातील 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थींना लागली आहे. ई-KYC प्रक्रिया वेळेवर पूर्ण केल्यासच हा हप्ता मिळू शकणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

9 लाख महिलांना ‘Ladki Bahin Yojana’ मधून वगळले
दरवर्षी ई-KYC अनिवार्य, अन्यथा हप्ता बंद
2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ नकार
‘Namo Shetkari Yojana’ आणि ‘Ladki Bahin Yojana’ यांचे विभाजन
फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी KYC महत्त्वाची

१०० रुपये पेट्रोल घेतल्यावर पंपवाले किती कमावतात? आश्चर्यचकित करणारी माहिती! | Petrol Pump Income

📢 लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा 1500 रुपये हप्ता बंद होऊ शकतो!

स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या आत्महत्येचा प्रयत्न, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयश! – अमितेश कुमार

Leave a Comment